पुणे : यवतमाळ येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांच्या नावाची शिफारस केली जाण्याची शक्यता असून साहित्य महामंडळासह काही घटक संस्थाही नेमाडेंच्या संपर्कात असल्याची माहिती खास सूत्रांकडून ‘लोकमत’ला मिळाली आहे.संमेलनाध्यक्ष पदासाठी निवडणूक न घेता घटक संस्थांनी सर्वांनुमते एखाद्या ज्येष्ठ साहित्यिकाची अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय महामंडळाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी यंदापासूनच होणार आहे. २८ आॅक्टोबर रोजी महामंडळाकडे घटक संस्थांकडून प्रत्येकी तीन नावे, समाविष्ट आणि घटक संस्थांकडून प्रत्येकी एक, निमंत्रक संस्थेकडून १, विद्यमान संमेलनाध्यक्षाकडून १ अशी नावे सूचवली जाणार आहेत. त्यातून एक नाव अंतिम केले जाणार आहे.नेमाडे हे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त एकमेव साहित्यिक हयात आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची शिफारस होऊ शकते. पण ते अध्यक्षपद स्वीकारतील का, याची शंका आहे.महामंडळाला नेमाडेंबद्दल मराठीचे सर्वोच्च सन्माननीय प्रतीक म्हणून अतीव आदरच आहे, पण ते अध्यक्षपद मान्य करतील काय, हा वेगळा प्रश्न आहे.- डॉ. श्रीपाद जोशी,अध्यक्ष, साहित्य महामंडळ
संमेलनाध्यक्षपदासाठी भालचंद्र नेमाडेंचे नाव?; प्रस्ताव पाठविला जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 1:28 AM