शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
5
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
6
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
7
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पूर्व भागाची तहान भागवण्यासाठी भामा-आसखेड ‘ड्रीम प्रोजेक्ट’ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:28 AM

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : संरक्षण, वन, जलसंपदासह विविध २२ खात्यांच्या परवनाग्या, आंदोलनांचा मागे लागलेला ससेमिरा व सात वर्षांचा कालावधी असे नानाविध अडथळे पार करीत आजमितीला पुणे महापालिकेचा ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्णपणे प्रत्यक्षात साकार झाला आहे़ तब्बल सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर या प्रकल्पातील पाणीपुरवठ्याची चाचणी सध्या सुरू असून, धरणातून पंपिग केलेले पाणी शहराच्या पूर्व भागातील नळांना येत्या नववर्षात म्हणजे जानेवारी,२०२१ च्या पहिल्याच आठवड्यात घराघरात पोहणार आहे़

पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे लोहगाव, कळस, धानोरी, वडगावशेरी, खराडी, चंदननगर, येरवडासह साधारणत: ५८ चौरस किलोमिटरच्या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे़ खडकवासला धरणातून यापूर्वी होणारा पाणीपुरवठा चार ठिकाणी पंपिग होऊन या भागात पोहचत असल्याने, विज पुरवठा खंडित झाल्यावर बंद होणारा पाणीपुरवठा, पाईपलाईनच्या समस्या, वाढती लोकसंख्या व पाण्याची कमतरता यामुळे शहराचा पूर्व भाग सतत पाणी समस्येने ग्रासला होता़

वर्षोनुवर्षे महापालिकेचे मुबलक पाणी नसल्याने टँकरची वाट पाहणाऱ्या येथील नागरिकांना आता नवीन वर्षात चोवीस तास पाणीपुरवठा तेही एकाच ठिकाणी पंपिग व उर्वरित सर्व वहन हे ‘ग्रॅव्हिटी’ने (विना पंपिंग करता नैसर्गिक उतारामुळे) प्राप्त होणार आहे़ ‘भामा-आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प’ पूर्ण झाल्याने शहराच्या पूर्व भागाला आपले हक्काचे ‘२०० एमएलडी पाणी उपलब्ध होत आहे़

प्रकल्प साकारताना स्थानिक शेतकऱ्यांचा विरोधासह नानाविध कारणांमुळे हा प्रकल्प रेंगाळला़ पण या अडचणी येत असतानाही, उर्वरित भागातील काम कसे पूर्ण होईल याकरिता महापालिकेच्या अभियंत्यांनी चंग बांधला़ त्याचे फलित म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागताच अवघ्या काही दिवसात आसखेड गावातील तसेच केळगावातील जलवाहिनीचे काम हातोहात पूर्ण झाले़

चौकट

महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधिक्षक अभियंता युवराज देशमुख, कार्यकारी अभियंता सुदेश कडू यांसह पालिकेचे १० अभियंते व ४०० जणांचा संघ या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सात वर्षे अहोरात्र कार्यरत राहिली़ या काळात महापालिकेसह राज्यातही सत्तांतर झाले. त्यानंतरही सर्वांनी हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी प्रशासनास पाठबळ दिले़ त्यामुळे अनेक वर्षांपासून पुरेशा पाण्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागणाऱ्या शहरातील पूर्व भागातील नागरिकांची तहान हा प्रकल्प प्रत्यक्षात आल्याने भागणार आहे.

--------------------

फोटो मेल केला आहे

भामा आली दारी

-----------------------