शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
3
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
4
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
5
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
6
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
7
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
8
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
9
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
10
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
11
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
12
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
13
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
14
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
15
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
16
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
17
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
18
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
19
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
20
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार

भांबोलीतील मजूर मृत्यूप्रकरण दडपले?

By admin | Published: December 27, 2016 3:08 AM

कंपनीत काम करीत असताना भिंत अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात दोषी कोण आहे? याचा शोध न घेता केवळ पैशाच्या जोरावर

आंबेठाण : कंपनीत काम करीत असताना भिंत अंगावर पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात दोषी कोण आहे? याचा शोध न घेता केवळ पैशाच्या जोरावर प्रकरण दाबून सहीसलामत बाहेर पडण्याचा प्रकार खेड तालुक्यात भांबोली येथे घडला आहे. याशिवाय या कंपनीत टाकण्यात आलेला आणि कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असलेला मुरूम नक्की कोठून आणि कसा आणला? याचेही उत्तर गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण संशयास्पद वाटत असून त्याबाबत सर्वत्र उलटसुलट चर्चा सुरू आहे.याबाबत बीट अंमलदार अनिल जगताप यांच्याशी संपर्क साधला असता, आमचा पंचनामा सुरू आहे. पीएमचा रिपोर्ट येणे बाकी आहे, ऐवढेच उत्तर त्यांनी दिले. घटनेला महिना होत आला तरी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, चाकण औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक २ मध्ये भांबोली (ता. खेड) गावच्या हद्दीत वेस्टर्न हिट फोर्ज ही कंपनी आहे. या कंपनीच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या आवारातील जागेत आणि दुसऱ्या कंपनीच्या भिंतीला लागून असणाऱ्या जागेत गटाराच्या लेवलिंगचे काम सुरू असताना या कंपनीमधील भिंत कोसळली आणि त्यात दोन कामगार दबले जाऊन मृत्युमुखी पडले. एक कामगार जखमी झाला होता. दुसऱ्या कंपनीची भिंत आणि या कंपनीची भिंत या अवघे २-३ फुटांचे अंतर होते. या अरुंद जागेत वरील तीनही मजूर काम करताना या कंपनीच्या बाजूकडील सहा ते साडेसहा फूट उंचीची भिंत अचानक या तीनही मजुरांच्या अंगावर कोसळली. त्यात दत्ता कसबे आणि दैवाबाई जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. जेसीबीच्या साहाय्याने पडलेला मुरूम बाजूला करून या तिघांना बाहेर काढण्यात आले. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. हे सर्वजण भोसरी येथील बालाजीनगर परिसरात राहत होते. याबाबतची फिर्याद कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी विशाल राजेंद्र दहापुते यांनी चाकण पोलीस ठाण्यात दिली होती.घटना घडल्यानंतर अनेक दिवस पंचनामा सुरू आहे, असे उत्तर पोलीस खात्याकडून देण्यात येत आहे. नंतर अचानक काही दिवसांनंतर प्रकरण मिटले आहे, असे उत्तर पोलीस खाते आणि कंपनी प्रशासनाकडून देण्यात येऊ लागले. एरव्ही गुन्हे नोंद करण्यात तत्पर असणारे पोलीस या प्रकरणात ढिले का पडले, याचे उत्तर गुलदस्त्यात आहे. यात मृत व्यक्तींच्या वारसांना काही रक्कम दिल्याचे बोलले जात आहे. परंतु पैशाने अशा गोष्टींवर पांघरूण घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्यानंतर पैसे देऊन प्रकरण मिटविता येते, असा संदेश समाजात जाईल आणि मग अराजकता माजेल यात तिळमात्र शंका नाही.पोलीस खातेदेखील या मृत नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या खऱ्या गुन्हेगारांचा शोध घेत नसून भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनल्याचे दिसत आहे. यात पोलीस खात्याचे हात ओले झाले असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात सुरू आहे. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे, अजून शवविश्चेदन अहवाल अजून आला नाही, असे ढोबळ उत्तर पोलीस खाते देत आहे. (वार्ताहर)कंपनीने चोरीचा मुरूम घेतलाच कसा? याशिवाय या घटनेत दुसरी बाब अशी समोर येते आहे की, ज्या मुरुमाच्या दाबाने ही भिंत पडली तो मुरूम चोरी करून कंपनीत आणला गेला होता का? या मुरुमाची शासकीय दरबारी कुठल्याही प्रकारची शासकीय किंमत भरली नसल्याची बाब समोर येत आहे. त्यामुळे कंपनीत भरावासाठी आणला गेलेला मुरूम कोणी आणि कोठून आणला? त्याची रॉयल्टी भरली आहे काय? भरली नसेल तर महसूल विभाग डोळे झाकून का बघत आहे? कंपनीने चोरीचा मुरूम घेतलाच कसा? असे अनेक अनुत्तरित प्रश्न उभे राहत आहे.