शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भानुदास भगवंत लोखंडे यांची गुप्त मतदानातून, तर उपसरपंचपदी संतोष मुक्ताजी भुसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिल लोखंडे व खेड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनी एकत्रित येऊन महाविकास आघाडीकडे सत्ता ठेवण्यात यश मिळविले.
सरपंचपदासाठी भानुदास भगवंत लोखंडे व सतीश बाजीराव लोखंडे यांचे, तर उपसरपंचपदासाठी संतोष मुक्ताजी भुसे व वैशाली मच्छिंद्र लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र वैशाली लोखंडे यांनी उपसरपंच पदासाठी असलेला अर्ज माघारी घेतल्याने संतोष भुसे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. उर्वरित सरपंचपदासाठी गुप्त पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये भानुदास लोखंडे यांना ९, तर सतीश लोखंडे यांना ६ मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी आर. डी. शिंदे यांनी भानुदास लोखंडे यांना सरपंचपदी तीन मतांनी, तर संतोष भुसे यांना बिनविरोध विजयी घोषित केले.
बिनविरोध विजयी झाले.
याप्रसंगी रमेश गोडसे, रामदास जयवंत लोखंडे, जयवंत भुसे, सुहास खांदवे, आनंदा वर्पे, ग्रामपंचायत सदस्य अमोल लोखंडे, रामदास लोखंडे, हनुमंत लोखंडे, नयना वर्पे, नयना लोखंडे, शीतल लोखंडे, संगीता लोखंडे, उज्वला लोखंडे, संतोष कुंभार, स्वाती चव्हाण, आशा लोखंडे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून विजयी मिरवणूक काढण्यात आली. पदाच्या माध्यमातून समाजकार्याला प्राधान्य देत गावचा विकास साधण्याचे आवाहन संचालक अनिल लोखंडे व अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनी केले.
मरकळ (ता. खेड) येथे सरपंच व उपसरपंच निवडीनंतर जल्लोष करताना पदाधिकारी व ग्रामस्थ. (छाया : भानुदास पऱ्हाड)
२५ शेलपिंपळगाव मरकळ