Bharat Bandh : बंदला समिश्र प्रतिसाद, पेट्राेलपंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 01:59 PM2018-09-10T13:59:04+5:302018-09-10T14:01:34+5:30

काॅंग्रेसने पुकारलेल्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद शहरात मिळत असल्याचे चित्र अाहे. बरेचसे पेट्राेलपंप बंद असल्याने वाहनचालकांचे चांगलेच हाल झाले.

Bharat Bandh: medium response to bharat band | Bharat Bandh : बंदला समिश्र प्रतिसाद, पेट्राेलपंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल

Bharat Bandh : बंदला समिश्र प्रतिसाद, पेट्राेलपंप बंद असल्याने वाहनचालकांचे हाल

Next

पुणे : काॅंग्रेसने पुकारलेल्या बंदला शहरात समिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र अाहे. शहरातील जनजीवन सुरळीत सुरु असून अनेक ठिकाणी खबरदारी म्हणून दुकाने बंद ठेवण्यात अाली अाहेत. सकाळी पीएमपीवर झालेली दगडफेक वगळता बंदला शहरात कुठलेही हिंसक वळण लागले नाही. शहरातील पेट्राेलपंप बंद असल्याने वाहनचालकांचे मात्र चांगलेच हाल झाले. 

    पेट्राेल व डिझेलच्या दर सातत्याने वाढत असल्याने सामान्य लाेकांचे कंबरडे माेडले अाहे. पेट्राेल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इतर जीवनावश्यक वस्तूंचे भाव सुद्धा वाढले अाहेत. याविराेधात काॅंग्रेसकडून अाज बंदचे अावाहन केले हाेते. काॅंग्रेस साेबतच इतर विविध विराेधी पक्षांनी या बंदला पाठिंबा दिला अाहे. राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसबराेबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही बंदमध्ये सहभागी झाली अाहे. या बंदला शहरात समिश्र प्रतिसाद मिळत अाहे. अनेक ठिकाणांची दुकाने खबरदारी म्हणून बंद ठेवण्यात अाली अाहेत. रस्त्यावर अाज नेहमीपेक्षा वाहतूक कमी दिसत अाहे. शाळा- महाविद्यालये सुद्धा सुरळित सुरु अाहेत. सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कुमठेकर राेडवर एका पीएमपीच्या बसला लक्ष केले. त्याचबराेबर मार्केटयार्ड परिसरातही एका बसवर दगडफेक झाल्याचे समाेर अाले अाहे. पाैड रस्त्यावर दुपारी मनसे कार्यकर्त्यांनी चार पीएमपी बसेसच्या चाकांमधील हवा साेडली. त्यामुळे वाहतूकीला काहीकाळ अडथळा निर्माण झाला हाेता. 

      दरम्यान मंडई परिसरातही या बंदला फारसा प्रतिसाद मिळला नाही. अनेक दुकाने सुरु ठेवण्यात अाली हाेती. साेमवार असल्याने लक्ष्मीराेडवरील अनेक दुकाने बंद हाेती. कुमठेकर राेडवरील दुकाने बंद ठेवण्यात अाली हाेती. रस्त्यावर वाहतूक काहीशी कमी असली तरी जनजीवन सुरळीत सुरु अाहे. 

Web Title: Bharat Bandh: medium response to bharat band

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.