राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर भाजपा तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, शहराध्यक्ष शकिलभाई सय्यद, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राम आसबे, ललेंद्र शिंदे, जगदीश मोहिते, इम्रानभाई जमादार, दादा गवळी, तेजस जगताप यांनी तहसीलदार अनिल ठोंबरे यांच्याकडे लेखी निवेदन दिले. पश्चिम बंगाल राज्यामध्ये निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. भारतीय जनता पक्षाचा निवडणुकीत पराभव झाला. वास्तविक पाहता पूर्वीच्या तुलनेत भारतीय जनता पक्षास भरपूर जागा मिळाल्या. जनतेचा कौल भारतीय जनता पक्षाने मोठ्या मनाने स्वीकारला. तरीही पश्चिम बंगाल राज्यात तृणमूल काँग्रेसच्या हिंसाचाराचा उद्रेक झाला. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांवर, नेत्यांवर, पदाधिकाऱ्यांवर अन्याय झाला. त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो.
इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने हिंसाचारात बळी पडलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना विनम्रपूर्वक भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करत आहोत. हा हिंसाचार लोकशाहीला काळिमा फासणारा आहे.
फोटो ओळ : इंदापूर तहसीलदार यांना निवेदन देताना भाजपा कार्यकर्ते.