रोहिणी शंकर वाघमारे (वय ३५, खुळेवाडी, ता. हवेली) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर शंकर बाबासाहेब वाघमारे (वय ४०), पूजा शंकर वाघमारे (वय १५), दादासाहेब पिराजी खुळे (वय ३८, सर्व रा खुळेवाडी, ता. हवेली) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, हवेली तालुक्यातील खुळेवाड येथून भरधाव वेगाने निघालेली स्वीफ्ट डिझायर ही कार शिरसगाव काटा येथे आल्यानंतर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले व कार रस्त्यावर तीन कोलांट्या उड्या खात थेट शेजारील उसाच्या शेतात जाऊन पडली. उसाच्या शेतात उडून पडताना कार इतकी उंच आणि लांब उडाली की ती शेताच्या मध्यभागी पडल्याने शेताच्या आत गाडी असल्याचे कोणाच्या लक्षात आलेच नाही. कारमधून मुलीच्या रडण्याचा आवाज आल्याने काही तरुणांनी शेतात पाहिल्यावर तेथे अपघातग्रस्त कार उडून पडल्याचे उघड झाले. अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी तरुणांनी प्रयत्न सुरू केला मात्र गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने लोखंडी साहित्याच्या मदतीने तरुणांनी आत अडकलेल्या जखमींची सुटका केली.
घटनेची माहिती मिळताच मांडवगण फराटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पाटील शीतल गायकवाड, संतोष जाधव, एम. एस. कदम, सूत्रधार शिंदे, वैभव पवार, विकास केदारी, तेजस जाधव, कुलदीप शिंदे, राजकुमार काटे, स्वप्निल काटे यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात पोचविण्यासाठी मोठे सहकार्य केले.
--
फोटो क्रमांक : २० रांजणगाव सांडस अक्सिडेंट
अपघातग्रस्त कार
फोटो क्रमांक : २० रांजणगाव सांडस रोहिणी वाघमारे