खासदार शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार (वय ७७ वर्षे) यांचे आज सोमवारी सायंकाळी दीर्घआजाराने निधन झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्ट करुन ही माहिती दिली. भारती पवार यांच्यामागे एक मुलगा आणि एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. भारती पवार यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी १२ वाजता नवी पेठेतील वैकुंठ स्माशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
भारती पवार यांचे बालपण मुंबईत गेले. त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्या मंदिरात झाले. रुईया महाविद्यालयातून त्यांनी कला शाखेची पदवी घेतली. १९७० मध्ये त्यांचा विवाह प्रतापराव पवार यांच्याशी झाला.