भोर: तालुक्यात आठ दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे भाटघर ६८.७४% तर नीरा देवघर धरण ९२.३०% भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरणात २७% तर नीरा देवघर धरणात ६६ टक्के अधिक पाणीसाठा आहे.
भोर तालुक्यात संततधार सुरु असून, आज भाटघर धरणभागात १७ मिलिमीटर तर एकूण ४७० मिलिमीटर पाऊस होऊन धरण ६७.७४% भरले आहे. मागच्या वर्षी ३८ टक्केच धरण भरले होते. तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यातील नीरा देवघर धरणभागात आज ४० मिलिमीटर तर एकूण १५९९ मिलिमीटर पाऊस झालेला आहे. धरण ९२.३० टक्के भरले आहे. गतवर्षी धरण २४ टक्केच भरले होते तर चापेट गुंजवणी धरणभागात आज ४४ मिलिमीटर एकूण १२२६ मिलिमीटर पाऊस होऊन धरण ९२% भरले आहे.
वीर धरणभागात आज ० मिलिमीटर तर एकुण २४१ मिलिमीटर पाऊस होऊन धरण ९७% भरले आहे.
भोर तालुक्यात पावसाची संततधार सुरुच असल्यामुळे धरण भागातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढताना दिसत आहे.
पावसाची परिस्थिती अशीच कायम राहिल्यास निरादेवघर धरणा या महिन्यात तर भाटघर धरण भरायला आँगस्ट उजाडेल.भाटघर धरण २४ टीएमसी तर निरादेघर धरण १२ टिएमसी क्षमता आहे.तर गुंजवण धरण ४ टीएमसीचे असा एकुण ४० टिएमसी पाणी आडवले जाते आणी उन्हाळयात पुर्वेकडील लोकांना शेतीला आणी पिण्याच्या पाण्यासाठी सोडले जाते स्थानिकांना फारसा उपयोग होत नाही. दरवेळी उन्हाळ्यात भाटघर आणी नीरा देवघर धरणभागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते.
ब्रिटिशकालीन भाटघर धरण
(छाया : इम्रान आतार भोर)