लोकमत न्यूज नेटवर्कधायरी : धायरी फट्यापासून गारमाळ, गणेशनगर, धायरी गाव येथे काही ठिकाणी पीएमपी बसथांब्यांची पाटी आहे; पण शेडचा एकही बसथांबा नाही. शाळकरी मुले, वृद्ध नागरिक व स्त्रियांना भरउन्हात व भरपावसात बसची वाट पाहत उभे राहवे लागते. धायरीतून पुणे शहरातील स्वारगेट, हडपसर, वाघोली, निगडी, शिवाजीनगर व इतर प्रमुख मार्गांवर पीएमपीच्या दिवसभरात सुमारे २०० ते २५० फेऱ्या होतात. या विविध मार्गांवरील फेऱ्यांतून धायरी डीएसके विश्व आणि नऱ्हे येथील हजारो नागरिक बसने प्रवास करतात.अगदी वळणावरच बस थांबतात. शेजारीच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या रिक्षा उभ्या असतात, तसेच भाजीविक्रेते, हातगाडीवाले उभे असतात. या सर्वांमधून प्रवाशांना आपला जीव मुठीत धरून बस पकडावी लागते.हीच परिस्थिती धायरीतील सर्वच बस स्थानकांची झाली आहे. तर, याउलट धायरीकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या धायरी फाट्यालगत असलेल्या शेडच्या बस स्थानकात बस थांबतच नाही. पुढे ५० मीटर अंतरावर असलेल्या सिंंहगड रोडवरील बस स्थानकात बस थांबतात. मग हे शेडचे बस स्थानक कोणासाठी व कशासाठी आहे, असा सवाल सहजच मनात येतो.
धायरीत बसथांब्यांची वानवा
By admin | Published: June 29, 2017 3:39 AM