शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: "रामटेकमध्ये जयस्वाल नकोच, महायुतीने दुसरा उमेदवार द्यावा"
2
आज माझं कुटुंब कोसळलं आहे, पण...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर मुलगा झिशान सिद्दिकींनी काय आवाहन केलं?
3
इस्रायलच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवार ठार; 3 महिन्यांत 3 मोठे शत्रू संपवले
4
'जुन्या गोष्टी विसरुन भविष्याकडे वाटचाल करा', भारत-पाक संबंधांवर नवाझ शरीफ स्पष्ट बोलले
5
"वरोराची जागा भाजपलाच हवी, अन्यथा...", पक्षाला इशारा, इच्छुक धडकले कार्यालयात
6
सरकारनं खेळाडूंची बक्षिसं दिली नाहीत, विश्वविजेत्या संघातील काहींशी चर्चा झाली; आव्हाडांचा दावा
7
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
8
'या खुर्चीने दगा दिला ऐसा की...'; शिंदेंच्या सेनेने ठाकरेंना व्यंगचित्रातून डिवचलं
9
IPL 2025: काव्या मारन खेळणार मोठा डाव; पॅट कमिन्स नव्हे, 'हा' स्टार क्रिकेटर खाणार जास्त 'भाव'
10
विधानसभेला भाजपचे प्रभाकर पाटील 'घड्याळ' हातात बांधणार?; महायुतीत हालचाली गतीमान; लवकरच शिक्कामोर्तब!
11
दोन महिन्यांपासून ठावठिकाणा नाही, शेख हसिना आहेत कुठे? समोर आली अशी माहिती
12
INDW vs NZW : टीम इंडियाची घोषणा! हरमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम; रिचा १२वी बोर्ड परीक्षेमुळे मुकणार
13
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खासगी प्रवासी बसची टेम्पोला धडक; अपघातात २३ जण जखमी 
14
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
15
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
16
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
17
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
18
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
19
'मिट्टी में मिला देंगे...', उत्तर प्रदेशातील 'योगी'राजमध्ये सात वर्षात 12 हजार एन्काउंटर
20
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले

भाऊ रंगारी गणपती बाप्पाचरणी अलोट गर्दी, बाप्पाची मूर्ती ठरतेय भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2022 9:36 PM

पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासह प्रमुख आठ गणेश मंडळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची गणना होते.

हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी होत आहे. ट्रस्टने यंदा दिल्लीतील श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला असून ही प्रतिकृती पाहण्यासाठी गणेशभक्त आवर्जुन भेट देत आहेत. विशेष म्हणजे येथील आगळी-वेगळी गणेश मूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासह प्रमुख आठ गणेश मंडळामध्ये श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची गणना होते. या मंडळाने यंदा श्री स्वामी नारायण मंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारली आहे. मंदिरातील आतील बाजूस करण्यात आलेली विद्युत रोषणाई आणि सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी आणि  देखावा पाहण्यासाठी गर्दी वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे शनिवार आणि रविवारी या दोन सुट्टीच्या दिवशी तर भाविकांनी अलोट गर्दी याठिकाणी केली होती.

दरम्यान दररोज कला, सामाजिक, राजकीय, शासकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते बाप्पाची आरती होते. आजवर उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार रोहित पवार, जयंत पाटील, विश्वजित कदम, नाना पटोले, प्राजक्ता माळी, पूजा सावंत, दिपाली सईद, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, एआयएटीएफ'चे अध्यक्ष एम. एस. बिट्टा, गिरनार पर्वताच्या दत्त गुरू पीठाचे पिठाधीश महेश गिरी बापू यांच्यासह अनेक मान्यवरांनी गणरायाची आरती करून दर्शन घेतले आहे. ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, जान्हवी धारीवाल-बालन हे स्वत: रोज पहाटेपर्यंत मंडळात उपस्थित असतात.

रंगारी वाडा पाहण्यासाठीही गर्दीश्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृती जवळच श्रींमत भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी नुकतेच त्याचे नुतनीकरण केले आहे. या वाड्याच्या माध्यमातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा ब्रिटीश साम्राज्याच्या विरोधातील लढाचा इतिहास भाविकांना माहिती होत आहे. त्याच बरोबर ब्रिटिशांच्या विरोधात लढाईसाठी वापरलेली शस्त्रास्त्रे ही येथे पहायला मिळत आहेत. त्यामुळे या वाड्याला गणेश भक्त आवर्जून भेट देत आहेत.

विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनगणेशोत्सवात दहा दिवस विविध सामाजिक उपक्रमही सुरू आहेत. आत्तापर्यंत मंडपात आरोग्य शिबीर, दंत तपासणी हे उपक्रम झाले असून आगामी काळात नेत्र शिबीर, फिजिओथेरपी आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेGanesh Mahotsavगणेशोत्सव