पुणे : भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिराचा दरवाजा ढकलून आत प्रवेश करुन मंदिरातील दान पेटी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी मंडळाचे सचिव दिलीप धोंडीराम आडकर (वय ५२, रा़ धनकवडी) यांनी विश्रामबाग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. ही घटना २६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून ३१ ते २ वाजून ४५ मिनिटांच्या दरम्यान गणपती मंदिरात घडला आहे़.श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या वतीने बुधवार पेठ येथील गणपती भवन व गणपती मंदिरात सीसीटिव्ही बसविलेले आहेत. गणपती मंदिरात भाऊसाहेब रंगारी यांनी स्वत: तयार केलेला लाकडी रथ व गणपतीची मुर्ती त्या ऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे १२९ वर्षापासून विराजमान असते व तीच मुर्ती गणेशोत्सवात दहा दिवसाकरिता प्रतिष्ठापना करून बसवली जाते़ गणपती मंदिरात स्टीलची असलेली दोन फुटाच्या आकाराची दानपेटी अनेक वर्षापासून ठेवलेली आहे. ही दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते. २६ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या पहाटे २ वाजून ३१ वाजता दोन चोरट्यांनी दुचाकी वाहनावरुन येऊन मंदिराचा दरवाजा तोडून चोरून नेल्याचे सीसीटिव्ही मध्ये कैद झाले आहे़. दोघांनी ही दान पेटी दुचाकीवरून पळवून नेली़ दान पेटीत किमान एक ते दीड हजार रुपये असण्याची शक्यता आहे़. भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिर हे विश्रामबाग व फरासखाना पोलीस ठाण्याच्या समोरील बाजूला दोन मिनिटांच्या अंतरावर आहे़. राज्यात हाय अलर्ट असताना पोलीस ठाण्यांच्या समोरील बाजूला असलेल्या मंदिरात चोरीची घटना घडली आहे़. या पूर्वी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवन उडवून देण्याच्या धमक्या आल्या होत्या. त्यामुळे ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तुच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे, असे ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड़ मिलिंद पवार यांनी सांगितले़.़़़़़़़़़शहरातील विविध मंदिरे तसेच सर्व सार्वजनिक गणेश मंडळे आणि नवरात्र महोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी मंदिरे उभारली आहे़. अशा मंदिरासमोरील दान पेट्या फोडून त्यातील पैसे चोरण्याचे प्रकार वारंवार होत असतात़. \\\\\\\\
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंदिरातील दानपेटी पळवली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 3:17 PM
ही दान पेटी दरवर्षी गणेशोत्सवात पहिल्या दिवशी व शेवटच्या दिवशी अनंत चतुर्थीच्या दिवशीच सर्व विश्वस्तांसमोर उघडली जाते.
ठळक मुद्देऐतिहासिक लाकडी रथावर सुमारे १२९ वर्षापासून विराजमान