पुणे : भारतातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे अचानक नाव काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी उर्फ भाऊसाहेब लक्ष्मण जावळे गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़. भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे कायदा सल्लागार अॅड. मिलिंद पवार व भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट च्या वतीने सचिव राजेंद्र गुप्ता, विश्वस्त सुरज रेणुसे, बाळासाहेब निकम यांनी माहिती दिली़. ब्रिटिश राजवटीत ब्रिटिशांनी जमावबंदीचे आदेश दिले होते. तसेच स्वातंत्र्याचा लढा त्यावेळी जोरात चालू होता. लोकांनी एकत्र येवून काहीतरी करणे गरजेचे झाले होते व तत्कालीन क्रांतिकारकांची बैठक भाऊसाहेब रंगारी यांच्या बुधवार पेठ सध्याचे रंगारी भवन येथे पार पडली होती व घरातला गणपती सार्वजनिकरित्या रस्त्यावर बसवून ऊत्सवाचे स्वरूप देण्याचे ठरले व त्यानुसार सर्वात प्रथम १८९२ मध्ये भाऊसाहेब रंगारी यांनी पुण्यात गणपती सार्वजनिक गणेशाची प्रतिष्ठापना करत गणेशोत्सव साजरा केला.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १८९४ मध्ये प्रथम पुणे येथे विंचूरकर वाड्यात गणपती बसविला. व त्यानंतर गणपती ऊत्सवाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार केला.
भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टची पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 3:03 PM
पुणे महानगरपालिकेने शासकीय अधिकृत वेबसाईटवरून भाऊसाहेब रंगारी यांचे नाव अचानक काढून टाकल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने पुणे पोलीस दलातील सायबर सेलकडे पुणे महापालिकेच्या सायबर सेल व संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दिली आहे़.
ठळक मुद्देमहापालिकेने अचानक काढून टाकले नाव : सायबर सेलकडे तक्रार