पुणे : कोरोनाचा प्रभाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. यात प्रामुख्याने, पुणे शहराच्या मध्यवस्तीतील झोपडपट्टी व दाट लोकवस्तीतील भाग आजही कायम पुढे राहिला आहे़ गुरुवारी दिवसभरात भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत केवळ नवे दोनच कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे.
आज शहरात दिवसभरात ५८८ नवे कोरोनाबाधित आढळून आले़ यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आढळून आले असून, येथील रुग्णसंख्या ही ८६ इतकी आहे़ त्यापाठोपाठ सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत ६८ रुग्ण आढळून आले आहेत़
------------
शहरातील गुरुवारी क्षेत्रीय कार्यालयनिहाय रुग्णसंख्या
वारजे-कर्वेनगर - ६३
ढोले पाटील रोड - ५५
नगर रोड-वडगावशेरी - ५३
धनकवडी-सहकारनगर - ५२
औंध-बाणेर - ४८
कोथरूड - बावधन - ३९
शिवाजीनगर -घोले रोड - ३१
कोंढवा-येवलेवाडी - २७
बिबवेवाडी - २३
वानवडी-रामटेकडी - १८
येरवडा-कळस-धानोरी - १६
कसबा-विश्रामबागवाडा - ७
-----------------