शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

एल्गार परिषदेच्या खटल्याशी एकबोटे आणि भिडेंचा संबंध नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2019 1:45 PM

कोरेगाव भिमा हिंसाचाराच्या खटल्याच्या पलीकडे एल्गार परिषद प्रकरणाचा कट शिजला असल्याचे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याचे अ‍ॅड. पवार म्हणाल्या.

ठळक मुद्देसरकारी पक्षाचा न्यायालयात युक्तिवाद एल्गार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य

पुणे : समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर भिमा कोरेगाव दंगलीच्या अनुषंगाने शिक्रापूर पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा आणि एल्गार परिषदेच्या खटल्याचा संबंध नसल्याचा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी बुधवारी न्यायालयात केला. या प्रकरणी अटक आरोपींच्या जामिनावर युक्तिवाद करताना दोन प्रकरणे एकत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोरेगाव भिमा हिंसाचाराच्या खटल्याच्या पलीकडे एल्गार परिषद प्रकरणाचा कट शिजला असल्याचे यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने नमूद केल्याचे अ‍ॅड. पवार म्हणाल्या. सुधीर ढवळे, रोना विल्सन, वरावरा राव, महेश राऊतसह इतर आरोपींच्या जामिनावर विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सुदर्शन पहाडसिंग आणि रामटेके या दोन नक्षलवाद्यांचा जबाब पुणे पोलिसांनी नोंदवला आहे. एल्गार प्रकरणात अटकेत असलेले आरोपी बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी दलित, अल्पसंख्याकांना संघटित करून माओवादी धोरणांचे पालन करण्याची भूमिका बजावली. अशांतता पसरविण्यासाठी निधी पुरविण्याचे व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचे कामकाज केले. भूमिगत कार्यकर्त्यांसाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उभा केला, असे त्यांच्या जबाबातून समोर आले आहे. माओवादी चळवळीशी जोडल्या गेल्याने महाराष्ट्र आणि छत्तीसगड येथील जंगलात गेलो. तेथे मिलिंद तेलतुंबडे आणि प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना भेटलो. माओवादी नेते गणपती आणि जी.एन. साईबाबा यांना अ‍ॅड. सुरेंद्र गडलींग यांनी कशी मदत केली. मिलिंद तेलतुंबडे यांनी 12 बोरगन, 200 काडतुसे दिले. भूमिगत सोनू भूपती याने अमेरिकी बनावटीचे पिस्तूल आणि 20 काडतुसे दिल्याचे रामटेके याच्या जबाबात नमूद आहे. तर पहाडसिंग याने त्याच्या जबाबात स्फोटक द्रव्याच्या खरेदीसाठी योजना तयार करण्यासाठी हैदराबादच्या भूमिगत मूर्ती याच्या संपर्कात आल्याचे सांगितले आहे, अशी माहिती अ‍ॅड. पवार यांनी न्यायालयाला दिली. 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMilind Ekboteमिलिंद एकबोटेElgar morchaएल्गार मोर्चा