भिगवण : इंदापूर येथे बंद पडलेली नादुरुस्त एसटी बस दुरुस्तीसाठी घेऊन जात असताना भिगवण येथे रविवारी मध्यरात्रीच्या वेळी प्रथमतः टायरने पेट घेवूला काहीवेळातच संपूर्ण एसटीला आग लागून एसटी जळून खाक झाली. या बसमध्ये कोणीही प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या दिशेने निघालेली एस.टी.बस क्र ( एम.एच १४ बी टी ४३९७) बंद पडलेली एसटी इंदापूर येथून तळेगाव डेपो, पिंपरी चिंचवड येथे दुरुस्तीकरीता टोचन करून घेऊन जात असताना ड्रायव्हर साईडच्या मागचे टायरला आग लागून काही वेळातच पूर्ण बसने पेट घेतला आणि जळून खाक झाली.
एस.टी बसचे चालक विठ्ठल दिनकर रायबोले आणि संदीप सखाराम साळवे यांच्यासह भिगवणचे साहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जरदे, पोलीस हवालदार लोडी यांनी आग विझविण्यासाठी कुरकुंभ औद्योगिक वसाहत व बिल्ट कंपनी येथील अग्निशामक दलाच्या साह्याने आग आटोक्यात आणली.