दावडी : खेड तालुक्याच्या पूर्व भागात जाणारी येथील भीमा नदी पावसाअभावी कोरडी आहे. चासकमान धरणातून भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.होलेवाडी, मांजरेवाडी, खरपुडी, निमगाव, दावडी या परिसरातून वाहणाºया भीमा नदीत कमी प्रमाणात पाणी असल्याने शेतकºयांचे हाल सुरू आहे.सध्या या परिसरात कांदालागवडी सुरू झाल्या आहेत. नदीपात्रात पाणी कमी असल्याने शेतकºयांना कृषिपंपांचे पाइप पाण्यापर्यंत जोडणे अवघड होत आहे. त्यामुळे कांदालागवडी व इतर घेतलेल्या पिकांना पाणी वेळेवर देता येत नाही. सध्या कधी ढगाळ वातावरण, कधी कडक ऊन त्यामुळे पिके सुकून गेली आहेत. चासकमान धरणातून पाणी सोडले तर पिकांचा प्रश्न मार्गी लागेल. पिकांना जीवदान देण्यास पाण्याची गरज असल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहे. भीमा नदीवर नदीकाठावर व परिसरात अनेक कृषिपंप असून, सुमारे २ किलोमीटरपर्यंत पाइपलाइन करून शेतकºयांनी पाणी आणले आहे. तसेच अनेक गांवाचा पाणीपुरवठा नदीलगत असलेल्या विहिरीतून होत आहे. पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.
भीमा नदीपात्र पावसाअभावी कोरडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 2:21 AM