01 Jan, 19 01:07 PM
सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील इंटरनेट सेवा बंद
01 Jan, 19 12:01 PM
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयस्तंभाला मानवंदना दिली अन्...
01 Jan, 19 11:42 AM
भीमा कोरेगाव 'विजयस्तंभाचा इतिहास'
01 Jan, 19 11:24 AM
विजय स्तंभापासून ठराविक अंतरावर विविध पक्ष संघटनांच्या अभिवादन सभांसाठी मंडप टाकण्यात आले आहेत.
01 Jan, 19 11:09 AM
वाहनतळापासून टोल नाक्यापर्यंत जाण्यासाठी पीएमपी आणि खासगी बसच्या शटल सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत
01 Jan, 19 10:53 AM
कोरेगाव भीमा परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त
01 Jan, 19 10:46 AM
कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून भीमसैनिक दाखल होत आहेत.
01 Jan, 19 10:19 AM
01 Jan, 19 09:35 AM
01 Jan, 19 09:30 AM
कोरेगाव-भीमा शौर्यदिनाला आज 201 वर्ष पूर्ण
कोरेगाव-भीमा शौर्यदिनाला आज 201 वर्ष पूर्ण, पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात, छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर
01 Jan, 19 08:44 AM
प्रकाश आंबेडकरांनी केले विजयस्तंभाला अभिवादन
भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजयस्तंभाला अभिवादन केले.
01 Jan, 19 08:30 AM
वाहतूक व्यवस्थेत बदल
कोरेगाव भीमा येथील कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. नगरकडून पुण्याकडे येणारी जड वाहने शिक्रापूर येथून चाकणकडे वळवली आहेत. नगरकडून हडपसरकडे येणारी वाहने शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-न्हावरा-केडगाव चौफुला-सोलापूर महामार्गावरुन हडपसरकडे वळवली आहेत. पुण्याकडून नगरकडे जाणारी वाहने चाकण मार्गे किंवा खराडी बाह्यवळण येथून नगरकडे वळवली आहेत.
01 Jan, 19 08:10 AM
कोरेगाव भीमामध्ये विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी
01 Jan, 19 08:08 AM
पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात
कोरेगाव भीमा परिसरात 1 व 2 जानेवारी 2018 रोजी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी प्रशासनाने कमालीची सतर्कता बाळगली आहे. कोरेगाव भीमामध्येच दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस फौजफाटा , वरुन व वज्र वाहने , अग्निशमन बंब , राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या तैनात आहेत. गावांमधुन सामाजिक सलोखा जपण्यासाठी प्रत्येक चौकात, वस्तीवर एक अधिकारी 10 कर्मचारी तैनात आहेत.
01 Jan, 19 08:05 AM
विजयस्तंभाला फुलांची आकर्षक सजावट
ऐतिहासिक 65 फुटी विजय स्तंभाची फुलांनी सजावट करण्यात आली आहे. स्तंभ परिसरात बुक स्टॅल, मानवंदनेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नछत्र उघडण्यात आले आहेत. यावर्षीही ‘एक स्तंभ एक व्यासपीठ‘ या संकल्पेचा आग्रह धरत सर्वच पक्षनेत्यांना एका व्यासपीठावर एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे भीमा कोरेगाव विजय रणस्तंभ सेवा समितीचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.
01 Jan, 19 08:04 AM
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर, भारत मुक्ती मोर्चाचे वामन मेश्राम, दलित कोब्राचे प्रमुख अॅड. भाई विवेक चव्हाण यांच्या स्तंभ परिसरात सभा होणार आहेत.