कोरेगाव भीमा: शौर्याचे प्रतिक असलेल्या कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभ परिसराचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याठिकाणच्या विकास आराखड्यसाठी उच्चस्तरीय सह स्थानिक अधिका-यांची शासकीय समिती स्थापन झाली असल्याचे सांगत विजयस्तंभ व वढू-तुळापुरचे चित्र पालटणर असल्याचे राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
कोरेगाव भीमा, वढू-तुळापुरचा विकासाची अंमलबजावणी होणार-
यावेळी अधिक उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की , बोलताना कोरेगाव भीमा येथील १८१८च्या लढाईतील शुरवीरांना अभिवादन करुन हा शौर्याचा पराक्रमाचा इतिहास पुढील पिढीला माहिती होण्यासाठी परिसराचा सामाजिक न्याय विभागाच्यावतीने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून विकास करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले असून कोरेगाव भीमा, वढू-तुळापुरचा विकासाची अंमलबजावणी होणार आहे.
ओमायक्रॉनच्या धर्तीवर काळजी घेण्याचे आवाहन-
स्तंभ परिसराच्या विकासासाठी भूसंपादन करणार असल्याचे सांगत याठिकाणी सर्व सुखसुविधा, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक यांच्या माध्यमातून शासकीय उच्यस्तरीय व स्थानिक स्थानिक समिती, गर्दी, पार्किंग, स्वच्छतेची व्यवस्था करण्यासाठी विकास करणार आहे. कोरोना झपाट्याने वाढत आहे, १० मंत्र्यांना २० पेक्षा जास्त आमदारांना लागल झाली असल्याने जनतेनी काळजी घेण्याचे आवाहन पवार यांनी केले.
कोरेगाव भीमा नजीक असलेल्या पेरणेफाटा (ता. हवेली) येथील ऐतिहासिक विजयस्तंभास मानवंदना व अभिवादन करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे , खासदार अमोल कोल्हे, जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, मुख्यकार्यकारी अधिकारी आयुश प्रसाद माजी आमदार प्रकाश गजभिये, जयदेव गायकवाड, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये आदी उपस्थित होते. यावेळी बार्टी व समाजकल्याण विभागाच्यावतीने अजित पवार, धनंजय मुंडे, संजय बनसोडे यांचा विजयस्तंभाची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले.