पाटस : पाटस (ता. दौंड) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या १० वर्षांतील आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष तथा पुणे जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नामदेव ताकवणे व भाजपाचे दौंड तालुकाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.तोडणी वाहतुकीसाठी एका हंगामात कारखान्याने वाहतूकदारांच्या नावाने एकापेक्षा जास्त बँकांचे कर्ज उचललेले आहे. ही मोठी फसवणूक आणि भ्रष्टाचार आहे. कामगारांच्या पीएफचे पैसे भरले जात नाहीत. यामध्येदेखील अनेक वर्षांपासून अनियमितता आहे. ऊस उत्पादकांची ऊसबिले दिली नाहीत. तर, कामगारांचे मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे. तालुक्यातील ४९ हजार २०० ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर प्रेम व्यक्त करून महाराष्ट्र शासन ३५ कोटी ९० लाख रुपये कर्ज स्वरूपात देणार आहे. तेव्हा या कारखान्याची चौकशी करणे गरजेचे आहे.
‘भीमा-पाटस’ची गेल्या १० वर्षांची चौकशी करावी
By admin | Published: June 29, 2017 3:24 AM