शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

भीमा-पाटसला ‘काम बंद’

By admin | Published: March 14, 2016 1:22 AM

भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात रविवारी (दि. १३) काम बंद आंदोलन करून प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निषेध केला

कुरकुंभ : भीमा-पाटस कारखान्याच्या कामगारांनी कारखाना व्यवस्थापनाच्या विरोधात रविवारी (दि. १३) काम बंद आंदोलन करून प्रवेशद्वारावर काळ्या फिती लावून निषेध केला.गेल्या ९ महिन्यांपासून कामगारांचे थकीत पगार व इतर मागण्यांसाठी शनिवारी (दि. १२) कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर, संचालक आबा खळदकर व कामगार संघाचे सदस्य यांच्यात चर्चा सुरू होती. चर्चेदरम्यान बारवकर यांनी दमबाजी व शिवीगाळ केल्याप्रकरणी कामगार संघटनेच्या वतीने हा निषेध केला.याबाबत कामगार संघटनेचे अध्यक्ष अर्जुन दिवेकर म्हणाले की, थकीत पगारापोटी १४ कोटी, तर निवृत्त झालेल्या कामगारांना ७५ लाख रुपये येणे बाकी आहे. याबाबत कारखाना व्यवस्थापन गेली अडीच वर्षे टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. या वर्षी ऊस हंगामात कारखान्याचे गाळप कमी झाल्याचे कारण व्यवस्थापन कामगारांच्या माथी मारत असल्याने कामगारांना जाणूनबुजून त्रास दिला जात आहे. यातच बारवकर यांनी शिवीगाळ केली आहे. जोपर्यंत यापुढील चर्चेला कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल येत नाहीत व कामगारांची सर्व देणी देण्यात येत नाही, तोपर्यंत काम बंद आंदोलन केले जाणार असल्याचे दिवेकर यांनी सांगितले. संघटनेचे सदस्य रामभाऊ बरकटे, हनुमंत वाबळे यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, व्यवस्थापनाची ही दादागिरी खपवून घेणार नसल्याचे सांगितले. या वेळी कामगार संघटनेचे रामभाऊ बरकडे, हनुमंत वाबळे, संजय शितोळे यांच्यासह कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)