बेंडे म्हणाले की, आडसाली ऊस लागवडीसाठी १ जून ते ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये को. ८६०३२ व को.एम.०२६५ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. पूर्व हंगामी लागवडीसाठी १ सप्टेंबरपासून ३१ ऑक्टोबर २०२१ कालावधीमध्ये को.एम.०२६५ तसेच १ सप्टेंबरपासून ३० नोव्हेंबर २०२१ कालावधीमध्ये को.८६०३२, व्ही.एस.आय.०८००५, एम.एस.१०००१ व को.९०५७ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे. सुरू हंगामासाठी १ डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ अखेरपर्यंतच्या कालावधीमध्ये को.८६०३२, व्ही.एस.आय.०८००५, एम.एस.१०००१ व को.९०५७ या ऊस जातींच्या लागवडीस परवानगी देण्यात आली आहे.
कारखाना कार्यक्षेत्र व परिसरातील सभासद व ऊस उत्पादक यांना मागणीप्रमाणे ०१ जून २०२१ पासून वरील ऊस जातीचे बेणे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस लागवड करावयाच्या क्षेत्राचा ७/१२ उतारा संबंधित विभागीय गट कार्यालयात देऊन बेणे मागणी नोंदवावी. कारखान्यामार्फत उधारीने वसूलपात्र तत्त्वावर राबविणेत येणाऱ्या माती परीक्षण, ताग बियाणे, रासायनिक खते, द्रवरुप जीवाणू खते, ऊस रोपे, बायोकंपोस्ट, खोडवा व्यवस्थापनामध्ये पाचट कुट्टी सुविधा, लागवड व खोडवा उसामधील ठिबक सिंचन योजना व त्यासाठी एकरी पाच हजार रुपये अनुदान, व्हीएस.आय.चे मल्टीमायक्रोन्युट्रीएंट, मल्टीमॅक्रोन्युट्रीएंट, ह्युमिक ॲसिड, वसंत ऊर्जा, जैविक कीटकनाशक, बी.व्ही.एम. पुरवठा, ऊस पीक स्पर्धा इ. ऊस विकास योजनांचा लाभ सर्व ऊस उत्पादकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.