भीमाशंकर (पुणे) : वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या या परंपरेमुळे भीमाशंकरची व कोकणात राहणाऱ्या लोकांची भीमाशंकरवर असलेली श्रद्धा दिसून येते. भीमाशंकरची होळी पेटल्यानंतर कोकणातील सर्व होळ्या पेटतात. भीमाशंकर हे सुमारे १२०० मीटर उंचावर असून, याच्या खाली ठाणे व रायगड जिल्ह्यातील अनेक गावे आहेत.
भीमाशंकरची होळी पेटल्यानंतर काही मिनिटांत खालच्या या गावातील सर्व होळ्या पेटतात. खालचे लोक इथली होळी पेटल्याची वाटच पाहत असतात. भीमाशंकरमधील लोकही अंधार पडला की होळी पेटवतात, जेणे करून खालच्या लोकांना होळीचा उजेड दिसेल. या होळी सणातून कोकणातील लोकांची भीमाशंकरवर असलेली श्रद्धा व भक्ती दिसून येते. हा प्रसंग अतिशय सुंदर असा पाहण्यासारखा असतो.