लाखेवाडी : भोडणी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी धनश्री संतोष जगताप, उपसरपंचपदी मल्हारी रामचंद्र लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच पदासाठी सर्वसाधारण महिला या प्रवगार्तून धनश्री संतोष जगताप व शिवकन्या किशोर गोसावी या दोघांचे अर्ज प्राप्त झाले. त्याची छाननी केल्यानंतर ते वैध ठरले. यानंतर गुप्त पद्धतीने मतदान घेतल्यानंतर धनश्री संतोष जगताप या ५ मते मिळवून विजयी झाल्या, असे निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. कापसे यांनी जाहीर केले. तसेच उपसरपंच पदासाठी मल्हारी रामचंद्र लोखंडे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला व तो वैध ठरला. त्यामुळे ते बिनविरोध निवडून आल्याचे आर. जी. कापसे अधिकारी यांनी जाहीर केले.
या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य छाया शिंदे, सुनील पवळ, राधिका गोसावी, शोभा हांगे व शिवाजी हांगे, शिवकन्या गोसावी, संचित हांगे पॅनल आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी पी. जी. कापसे व सहायक निवडणूक अधिकारी सूरज पाटमास आणि ग्रामसेवक गणेश लंबाते यांनी काम पाहिले.