पुणे : नागपूर मेट्रोच्या व्हायाडक्ट सेगमेंटच्या कामासाठी २२ महिन्यांचा कालावधी लागला होता, तेच पुणे मेट्रोचे काम १२ महिन्यांत पूर्ण झाले आहे. नागपूरमधील कामाच्या अनुभवामुळे पुण्यातील कामे वेगाने पुढे सरकत असल्याची माहिती महामेट्रोचे संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली. यापुढील काळातही याच वेगाने मेट्रोचे काम पूर्ण होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे भूमिपूजन २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्याला एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ीदक्षित यांनी व्हिडियो कॉनफरन्सद्वारे पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रह्मण्यम, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका १ चे प्रकल्पाधिकारी सुनील म्हस्के, वनाझ ते रामवाडी मार्गाचे प्रकल्पाधिकारी गौतम बिºहाडे उपस्थित होते.
भूमिपूजनाला १ वर्ष पूर्ण, पुणे मेट्रोचे काम अधिक वेगाने : ब्रिजेश दीक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 7:02 AM