पुणे : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या विविध संघटनेच्यावतीने करण्यात येत होती. अखेर आद्यक्रांतिगुरु लहुजीं वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे (दि. २) मार्च शनिवार दुपारी २ वाजता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस , अजित पवार यांच्या हस्ते संगमवाडी येथील क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधिस्थळावर पार पडणार असल्याचे क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांनी गुरूवारी नवीपेठ येथे पत्रकार परिषदेत दिली.
यास्मारकाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे. राष्ट्रीय स्मारकाचा महत्त्वपूर्ण कार्य महायुती सरकारने केले असल्याने मातंग समाजाच्या वतीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. तसेच यासमारंभासाठी पुणे ,पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दयानंद अडागळे,संतोष लांडगे ,रामदास साळवे ,दत्ता जाधव या सह विविध पक्ष संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.