या रस्त्याचा उपयोग कीवत, गवडी, शिंद, नांद, ब्राम्हणघर, माळेवाडी, महुडे खुर्द, महुडे बुद्रुक, भानुसदरा वर्दळ असते. हा रस्ता १० किमीचा आहे. बऱ्याच दिवसांपासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा लोकमतने बातमी प्रसिद्ध केली होती. याचाच एक भाग म्हणून ह्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. त्या वेळी कोविड १९ मुळे काम बंद राहिले. आत्ता कामाला सुरुवात झाली तेव्हा मात्र रस्ता न उकरता त्यावर डांबराचा फवारा मारून खडी टाकली जात आहे. या रस्त्याला फक्त मुलामा दिला जात आहे, अशी चर्चा या भागात रंगत आहे. कामाला सुरुवात केली मात्र ठेकेदार नागरिकांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून काम चालू ठेवत आहे. त्यामुळे हा रस्ता प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी आहे की अधिकारी व ठेकेदार पोसण्यासाठी, असा प्रश्न या भागातील नागरिक करीत आहेत.
पुढे रस्त्याचे काम चालू आणि मागे रस्त्याची खडी ठिकठिकाणी निघत आहे. यामध्ये डांबराचे प्रमाण कमी असल्याने व काम निकृष्ट होत आहे. यामुळे या कामाकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे.या भागातील नागरिकांची चर्चा चालू आहे. तसे न झाल्यास पावसाळ्यात तो रस्ता पाण्याने वाहून जाईल. संबंधित खात्याने या कामाकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन करू, असा इशाराही या भागातील नागरिकांनी दिला आहे.
सदर काम अंदाजपत्रकानुसार चालू आहे. रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे होईल व सदर काम झाल्यानंतर ठेकेदारावर तीन वर्षे त्या कामाची जबाबदारी राहील, असे शाखा अभियंता मो. वा. शेख यांनी सांगितले.
भोलावडे ते महुडे रस्त्याचे पुढे काम चालू मागे खड्डे पडत असल्याचे चित्र