तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने माहे मे २०२१ महिन्यात मोफत धान्यवाटप केले होते. तर केंद्र शासनाने माहे मे ते नोव्हेंबर २०२१ या पर्यंत मोफत धान्य देण्याचे जाहीर केले असताना प्राधान्य गटातील २६,०१७ शिधापत्रिकाधारक कुटुंबात १,२३,१७० व्यक्ती लाभार्थी आहेत, तर अंत्योदय योजनेखाली १९०१ शिधापत्रिकाधारक कुटुंबात ७,४४९ व्यक्ती लाभार्थी आहेत. या कार्डधारकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य देणार आहे. तर राज्य शासनातर्फे अन्नसुरक्षा योजने अंतर्गत प्राधान्य गटातील व अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना नियमितचे गहू २ रुपये किलो व तांदूळ ३ रुपये किलो या दराने दिले जाणार आहे. संबंधित धान्यवाटप पॉझ मशीनच्या सहाय्याने दिले जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रास्त भाव धान्य दुकानातून धान्य उपलब्ध करुन घेताना नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. तसेच सुरक्षित अंतर ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे.
भोर पुरवठा विभाग करणार मोफत धान्यवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:13 AM