भोर : भोर तालुक्यात कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपकेंद्र बांधण्यात आले. मात्र, सोयी-सुविधांचा अभाव, अपुरे कर्मचारी, अनेक आरोग्य उपकेंद्रात परिचारिका आठवड्यातून एक वेळाच उपस्थित राहतात. त्यात डॉक्टरही क्वचितच हजेरी लावत असल्याने रुग्णांना हेलपाटे मारत जावे लागत आहे. यामुळे तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे व २४ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रेच सलाईनवर असल्याची स्थिती ‘लोकमत पाहणी’त आढळली.भोरपासून सुमारे २७ किलोमीटरवर भाटघर धरण खोºयातील पांगारी येथे पुणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. या दवाखान्याची इमारत चांगली बांधण्यात आली आहे. त्यात संरक्षक भिंत, पाण्याची सुविधा करण्यात आली आहे. दवाखान्यात पांगारी, डेहेण, कोंडगाव, साळुंगण, गोरेवस्ती व आजूबाजूच्या दुर्गम डोंगरी गावातील नागरिक दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येतात. मात्र, दवाखान्यात केवळ एक परिचारिकेची नेमणूक करण्यात आली आहे. या परिचारिकेला दुर्गम गावात जाऊन विविध शासकीय कामे करण्याबरोबरच दुसºया दवाखान्यातही काम करावे लागते, त्यामुळे त्यांना आठवड्यातून एकदाच दवाखान्यात येण्यास वेळ मिळतो. उपकेंद्रात वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने महिनोन्महिने डॉक्टर दवाखान्याकडे फिरकत नसल्याचे चित्र असल्याने या ठिकाणी येणाºया रुग्णांना माघारी जावे लागत आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नसरापूर, आंबवडे, नेरे जोगवडी, भुतोंडे ५ प्राथमिक आरोग्य केंद्रे असून ३ ठिकाणी इमारती झाल्या आहेत. दोन ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्चून इमारती बांधण्यात येत आहेत, तर २४ आरोग्य उपकेंद्रे असून यातील बहुतांशी केंद्रांना इमारती आहेत. वीज, पाणी, सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज तर आरोग्य उपकेंद्रात आठवड्यातून एकदा वैद्यकीय अधिकारी असणे गरजेचे आहे.मात्र, वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो. कदाचित अपुºया आरोग्यसेवेमुळे ग्रामीण भागातही खासगी डॉक्टरांचे पेव फुटले आहे. यात अनेक बोगस डॉक्टरांचाही समावेश आहे. याकडे तालुका आरोग्याधिकाºयांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून मोठ्या प्रमाणात इमारती बांधल्या असून अनेक गावांत कामे सुरू आहेत. मात्र डॉक्टर नसतील तर त्या दवाखान्यांचा काय उपयोग, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे भोर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची आरोग्यसेवाच सलाईनवर असल्याचे चित्र ‘लोकमत पाहणी’त आढळले आहे.वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने रुग्णांना वेळेवर सेवा उपलब्ध होत नसल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यांचा आधार घ्यावा लागतो.भोर तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगली आरोग्यसेवा मिळावी, म्हणून आरोग्य विभागात डॉक्टर, तसेच वैद्यकीय अधिकाºयांची नेमणूक करण्याबरोबर पुरेशा प्रमाणात कर्मचारी देण्यात येतील, असे जिल्हा परिषदेच्या बांधकाम तसेच आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी सांगितले.
भोर तालुक्यातील रुग्णसेवा सलाईनवर, डॉक्टर कर्मचाऱ्यांचा अभाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:57 AM