Bhor Vidhan Sabha Election Result 2024 Live : भोर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदी मुळशी पुत्र व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार शंकर मांडेकर विजयी झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने जवळपास पंधरा वर्षानंतर मुळशी तालुक्याला मुळशी पुत्र आमदार मिळालेला आहे. शंकर मांडेकर यांनी सलग तीन वेळचे काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांचा 19638 मतांनी पराभव करीत भोर विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन घडविले आहे
भोर-वेल्हा-मुळशी असे तीन तालुके मिळून भोर विधानसभा मतदारसंघ बनलेल्या या तिन्ही तालुक्यांमध्ये नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांनी चांगले मताधिक्य घेतल्यानेच त्यांचा हा विजय झाला आहे. मतमोजणीला मुळशी तालुक्यातुन सुरुवात करण्यात आली होती त्यावेळी मुळशी तालुक्यामध्ये शंकर मांडेकर यांना 82961 मते मिळाली तर संग्राम थोपटे यांना 30036 मते मिळाली तेव्हा मुळशी तालुक्यातून शंकर मांडेकर यांना मुळशी तालुक्याने भरगच्च अशी एकूण 52925 मतांची आघाडी दिली
त्यानंतर भोर वेल्हा तालुक्यात देखील मांडेकर यांना चांगली मते मिळाली परंतु थोपटे यांना मांडेकर यांना मुळशी तालुक्यातून मिळालेली 52925 या मतांची आघाडी ही त्यांचा बाले किल्ला समजला जाणाऱ्या भोर-वेल्हा तालुक्यातून भरून काढता आली नाही तेव्हा या संपूर्ण लढती मध्ये शंकर मांडेकर यांना एकूण 126455 मते तर थोपटें यांना एकूण 106817 मते मिळाल्याने शेवटी शंकर मांडेकर यांनी थोपटे यांच्या वर 19638 अशा भरघोश मतांनी विजयी मिळविला आणि मुळशीकरांनी एकच जल्लोष करायला सुरुवात केली.
भोर विधानसभेचे उमेदवार व त्यांची मते
शंकर मांडेकर -126455 संग्राम थोपटे-106817 कुलदीप कोंडे - 29065
किरणदगडे-25601
पंधरा वर्षानंतर तालुक्याला मिळाला मुळशी पुत्र आमदार
सन 2004 मध्ये मुळशी तालुक्यामध्ये शिवसेनेचे शरद ढमाले हे आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु 2009 मध्ये मतदार संघाची विस्तार रचना करण्यात आली. त्यानंतर मुळशी तालुका हा भोर विधानसभेला जोडला गेला. त्यानंतर मात्र सलग तीन वेळा म्हणजेच पंधरा वर्ष काँग्रेसचे संग्राम थोपटे हे या मतदार संघामध्ये आमदार म्हणून निवडून आले. परंतु या पंधरा वर्षांनंतर पहिल्यांदाच भोर विधानसभेला संग्राम थोपटे यांच्या पुढे मुळशी पुत्र शंकर मांडेकर यांच्या रूपाने तगडा उमेदवार मिळाला. आणि शेवटी मांडेकर यांनी विजयश्री खेचून आणली त्यामुळे जवळपास पंधरा वर्षानंतर मुळशी तालुक्याला मुळशी पुत्र आमदार मिळाला आहे.