सूर्यकांत किंद्रे : भोरशहराचा वाढलेला पसारा, लोकसंख्या, तसेच तालुक्यात असलेली महत्त्वाची ठिकाणो याचा विचार करता भोर पोलीस ठाण्यात असलेली पोलिसांची संख्या मर्यादित आहे. हा सर्व भार केवळ 2क् ते 25 पोलिसांना सांभाळावा लागत आहे. स्वातंत्रपूर्व काळात या ठाण्यासाठी ब्रिटिशांनी मंजूर केलेल्या पोलिसांच्या संख्येत अद्यापही बदल झाला नसल्याने याचा ताण पोलिसांवर पडत आहे. यामुळे दोन ते तीन दिवसांनंतर फिर्याद घेतली जाते. एखादी घटना घडल्यास त्याचा तपास मोहिमेवर अपु:या संख्येमुळे परिणाम होत आहे.
भोर पोलीस ठाण्यांर्तगत 118 गावांसह भोर शहर मिळून सुमारे 1 लाख 15 हजार लोकसंख्या आहे. तालुक्याचे ठिकाण असल्याने प्रांत, तहसील, भूमिअभिलेख ही शासकीय कार्यालये ट्रेझरी, उपजिल्हा रुग्णालय, राष्ट्रीय महामार्ग या शिवाय दुर्गम डोंगरी भागातील वरंध, आंबाडखिंड घाट परिसरात मोबाईलसह इतर सुविधांचा अभाव असतो. तालुक्याचा विस्तार पाहता अत्यंत कमी म्हणजे दोन पोलिसांवर 25 ते 3क् गावांची जबाबदारी आहे. याचा ताण पोलीस यंत्रणोवर ताण येत आहे. भोर पोलीस ठाण्यांर्तगत पसुरे, हिडरेशी या दोन पोलीस चौक्या आहेत, एक पोलीस निरीक्षक, दोन सहायक पोलीस निरीक्षक तर 56 पोलीस मंजूर आहेत, त्या पैकी 28 कार्यरत असून 28 पोलीस व 6 अंमलदार सध्या कार्यरत आहेत. 6 पोलीस प्रतिनियुक्तीवर गेले आहेत. राहिले 22 कर्मचारी, आणि त्यातील रजा व सुटय़ा याचा विचार करता फक्त 15 पोलीसच भोरमध्ये काम करतात. दोघा पोलिसांना 25 ते 3क् गावांची जबाबदारी असते. (वार्ताहर)
4तालुक्यात डीपी चोरी, पेट्रोल चोरी, घरफोडय़ा हे प्रकार वारंवार घडतात. उपजिल्हा रुग्णालय असल्याने अपघात किंवा इतर कारणाने मृत्यू झालेल्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांना जावे लागते. तालुक्याचे भौगोलिक कार्यक्षेत्र लांब आहे. दुर्गम डोंगरी भागामुळे मोबाईल सुविधा नसल्याने संपर्क होत नाही. तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांची सुटीच्या दिवशी गर्दी असते. मांढरदेवी, काळुबाईच्या दर्शनाला मोठय़ा प्रमाणात भाविक येत असतात. या सर्वाचा ताण पोलिसांवर येतो. अनेकदा पोलीस ठाण्याला ठाणो अंमलदारही नसतो. अशा प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांना काम करावे लागत आहे. ब्रिटिशकालीन मंजूर केलेली पोलीस कर्मचा:याच्या सख्ंयेत बदल करुन पोलिसाची संख्या वाढवणो गरजेचे आहे व पोलीस कमी असलेल्या पोलीस ठाण्यात भरती करणो गरजेचे आहे, तरच सर्वसामान्यांना न्याय मिळणार आहे.