शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
6
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
7
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
8
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
9
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
10
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
11
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
13
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
14
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
15
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
16
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
17
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
18
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
19
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
20
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात

Bhosri Vidhan Sabha Election Result 2024 :भोसरीत तुतारी वाजणार की पुन्हा कमळ फुलणार? महायुतीचे लांडगे आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 10:22 AM

Bhosri Assembly Election 2024 Result Live updates महेश लांडगे हे भोसरी विधानसभेतून २ वेळा आमदार निवडून आले आहेत, आता हॅट्ट्रिक होण्याची संधी त्यांना आहे

Bhosri Assembly Election 2024 Result Live updates : दोन वेळचे आमदार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू महेश लांडगे यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अजित गव्हाणे यांनी भोसरीत कडवे आव्हान उभे केले. सध्या तरी भोसरीत लांडगे चौथ्या फेरीअखेर १३,००० मतांनी आघाडीवर आहेत. तर गव्हाणे यांना २६,००० मतं मिळाली आहेत. महेश लांडगे यांना ३९, ००० मतं मिळाली आहेत.  भाजपचे ‘मायक्रो प्लॅनिंग’ आणि लांडगे यांची ताकद असलेल्या मतदारसंघात दहा वर्षांचे प्रलंबित मुद्दे घेऊन गव्हाणे रिंगणात उतरले. त्यातच शरद पवार यांची सभा झाल्यानंतर वातावरण फिरल्याची चर्चा झाली. त्यामुळे भोसरीत यंदा तुतारी वाजणार की, पुन्हा कमळ फुलणार याककडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

इथं क्लिक करा >> महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ 

विकासकामांचा फायदा लांडगे यांना

भोसरी मतदारसंघात दोनवेळा महेश लांडगे निवडून आले. दहा वर्षांतील विकासकामे जनतेपुढे नेत ते तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. वीस वर्षे नगरसेवक आणि एकदा स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले अजित गव्हाणे यांनी योग्य वेळ साधत महायुतीतून शरद पवार गटात प्रवेश केला. तिकीट मिळवत त्यांनी लांडगे यांच्याविरोधात रान पेटवले. लांडगे यांनी योग्यवेळी हिंदुत्वाचे कार्ड काढत मतदारांना साद घातली. दहा वर्षांत झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा ठेवला. आंध्रा धरणातून सुरू झालेला पाणीपुरवठा, भामा-आसखेड योजनेचे काम, मोशीतील रुग्णालय, कचऱ्यातून वीजनिर्मितीचा प्रकल्प अशी कामे पुढे आणली. जगातील सर्वांत मोठा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि संविधान भवनाची केलेली पायाभरणी मांडत मराठा आणि ओबीसी मतदारांना साथ घातली. याचा फायदा लांडगे यांना होणार असल्याची चर्चा आहे.

परिवर्तनाचा मुद्दा गव्हाणेंच्या फायद्याचा

दुसरीकडे गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्यांचे न सुटलेले प्रश्न आणि भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त मतदारसंघ हे मुद्दे महाविकास आघाडीने उचलले. दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, पुणे-नाशिक मार्गावरील वाहतूककोंडी, ठेकेदारी प्रक्रियेतील रिंग आणि वाढलेली गुन्हेगारी प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवली. संभाजी महाराजांच्या पुतळ्यात झालेला भ्रष्टाचार आणि जमिनींचे व्यवहार अशा आरोपांनी वातावरण तापले. प्रचाराच्या शेवटी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सभा घेत परिवर्तनाचे आवाहन केले. त्यामुळे भोसरीत वातावरण फिरल्याची चर्चा झाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024bhosari-acभोसरीmahesh landgeमहेश लांडगेMahayutiमहायुती