विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणातील अडथळे व समस्या जाणून घेणे, विद्यार्थ्यांचा अभ्यास तपासणी करणे, मोबाईलचा अतिवापर करण्याचे दुष्परिणाम मुलांना समजावून सांगणे, पालक-शिक्षक समन्वय ठेवणे या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असे विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
या उपक्रमात तळेगाव परिसरातील कोल्हेमळा, केवटेमळा, कमेवाडी, गुरवमळा, शिंदेवस्ती, माळवाडी, नरकेवाडी, तोडकरवाडी, धायरकरवस्ती, तांबुळओढा, पांढरीवस्ती, माळीमळा, शेणाचामळा, चिमणापीरमळा, रामवाडी, आदी ठिकाणी असलेल्या विद्यार्थी व पालक यांच्या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन पालक व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. याप्रसंगी बहुतांश पालकांनी शाळा लवकर सुरू कराव्यात, अशी प्रमुख मागणी केली. विद्यालयाच्या या उपक्रमाचे ज्ञानदीप ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक शिवाजीराव भुजबळ, अध्यक्ष मंगल भुजबळ यांनी कौतुक केले. या उपक्रमात जी. बी. मुजांवडे, एम. एस. गायकवाड, किरण झुरंगे, आदेश गारगोटे, गणेश मांढरे, शालन खेडकर, मीनाक्षी चेडे, सुरेखा भांगे, जे. एन. कापरे, आदींनी सहभाग घेतला.