याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष संभाजीनाना होळकर, जि. प. सदस्य भरत खैरे, सरपंच स्वाती हिरवे, उपसरपंच मल्हारी खैरे, सदस्य शौकत कोतवाल, मुनीर डफेदार, रेखा चांदगुडे, राजश्री धुमाळ, सुमन जगताप, अशोक सकट, राष्टवादी युवक तालुका उपाध्यक्ष अनिल हिरवे, संपतराव जगताप, अशोक लोणकर, अजित बसाळे, संजय बारवकर, शफिक बागवान, भीमा वाघचौरे, सुशांत जगताप, ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर आदी उपस्थित होते.
येथील चौफुला रस्ता ते धनगरवाडा, इन्नुस कोतवाल घर ते संजय चिंचकर घर, नॅशनल हाउस ते गणेश साळुंके घर, नारायण धुमाळ घर ते नॅशनल हाउस ते सोमनाथ कदम घर, विठ्ठलमंदिर ते सिद्धार्थनगर आदी रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सुमारे एक कोटीचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी दादासाहेब लोणकर यांनी दिली.
सुपे येथील धनगरवाडा रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सभापती नीता बारवकर यांच्या हस्ते करण्यात आले.