या वेळी वाल्हेचे सरपंच अमोल खवले, महेश हिरे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, खरेदी - विक्री संघाचे संचालक संजय निगडे, माजी उपसरपंच सूर्यकांत भुजबळ, महिला आघाडीच्या ॲड. सरला तिवारी, माजी पोलीस पाटील प्रवीण कुमठेकर, ग्रामपंचायत सदस्य कांतीलाल पवार, वाल्हे शहर अध्यक्ष चंद्रकांत सासवडे उपस्थित होते.
वाल्हे गावातून वाहत येणा-या दोन्ही ओढ्यांचा संगम गायकवाड मळा हद्दीतील बुवासाहेब मंदिर परिसरात होतो. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन्ही ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर येऊन, अनेकांच्या मोठे नुकसान झाले होते. तसेच अनेक शेतक-यांची उभी पिके या पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. तसेच दोन्ही ओढ्याच्या संगमाजवळील भराव वाहून जाऊन, मोठे खड्डे तयार झाल्याने या रस्त्यावरून चालत जाणेही शक्य नव्हते. तसेच या ठिकाणी साकव पूल तयार करण्यात यावा अशी मागणी येथील शेतकरीवर्गाकडून अनेक वर्षांपासून होत होती.