पवारवाडी येथे १५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे युवा नेते बाबाराजे जाधवराव उपस्थित होते.
यावेळी माजी जि.प.सदस्या संगिता काळे, प्रकाशदादा पवार, गणेश जगताप, रविंद्र पवार, पांडुरंग मोरे, दिलीप आबा झेंडे, मंदार पवार, प्रमोद झेंडे, भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष योगेश काळे, दिवे गावचे सरपंच अमित झेंडे, उपसरपंच सुजाता जगदाळे, झेंडेवाडी गावच्या सरपंच पूनम झेंडे, उपसरपंच कौशल्या झेंडे, ग्रामपंचायत सदस्य गुलाबतात्या झेंडे, मोनाली झेंडे, वंदना खटाटे, शिवाजी खटाटे, अमर झेंडे, दादा झेंडे, माजी सरपंच मीनाताई झेंडे,सोनाली झेंडे , संगीता खटाटे,शरद झेंडे सुरज झेंडे ,अविनाश झेंडे उपस्थित होते.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच कौशल्या झेंडे यांनी गावच्या पाणी प्रश्नावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी केली. तसेच सरपंच पूनम झेंडे यांनी गावाला साध्या टँकरची मागणी केली व प्रादेशिक पाणी योजनेतून झेंडेवाडी गावाला योग्य पाणीपुरवठा व्हावा. शाळेसाठी निधीची मागणी केली.
त्वरित टँकरची मागणी पूर्ण करणार असल्याची ग्वाही तसेच गावातील अंतर्गत रस्ते बांधण्यासाठी निधी देण्यास परवानगीदेण्याबाबत दिवे, पवारवाडी, झेंडेवाडी आदी गावातील विकास कामे प्राधान्याने करण्यात येतील असे आश्वासन आमदार संजय जगताप यांनी दिले.
१९ गराडे भूमिपूजन
रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना संजय जगताप, बाबाराजे जाधवराव, पूनम झेंडे व इतर.