या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे, पंचायत समिती सदस्य अमोल पवार, सरपंच संघमित्रा नाईकनवरे, उपसरपंच लक्ष्मण भालेराव, ग्रा. पं. सदस्य राधा पडवळ, तुळसाबाई घाटे, रुपाली गोणते, दत्तात्रय नाईकनवरे, बाबा पडवळ, महिंद्रा नाईकनवरे, संपत दवणे, शिवाजी केदारी, संतोष मांडेकर, ग्रामविकास अधिकारी आर. आर. उगले, ठेकेदार सौरभ लंगोटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामीण भागातील युवकांमध्ये पारंपरिक व्यायामाची आवड निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कुस्ती आखाडे तयार करण्यात येत आहेत. पिंपरी पाईट जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांच्या पंधरा लाख रुपयांच्या निधीतून हे काम करण्यात येणार आहे. यामुळे कुस्ती आखाडा, प्रेक्षक बैठक व्यवस्था आदी कामे केली जाणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी आर. आर. उगले यांनी सांगितले.