सांडभोरवाडी काळूस गटाचे जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे याच्या प्रयत्नातून मांजरेवाडी गाव ते पाबळ रोड, कांचन गार्डन मंगल कार्यालय या दरम्यान एक किलोमीटर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. गेले कित्येक वर्षे या रस्त्याचे काम रखडले होते. पावसाळ्यात या रस्त्यावरून ग्रामस्थांना ये-जा करण्यास अडचण निर्माण होत होती. गावाची वस्ती या रस्त्यालगत असल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. शेतकऱ्यांना शेतमाल ने आण करण्यास रस्ता व्यवस्थित नसल्याने गैरसोय होत होती. या रस्त्याचे काम मार्गी लावावे, अशी मागणी होत होती. जिल्हा परिषद सदस्य काळे यांनी जिल्हा परिषद ग्रामिण मार्ग शंभर या योजनेतून सुमारे ३५ लाख रुपये निधी उपलब्ध करून रस्त्याचे काम मार्गी लावले आहे. या रस्त्याचे अर्धा किलोमीटर सिंमेट रस्ता तयार करण्यात येणार असून, अर्धा किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी मांजरेवाडीच्या सरपंच अनिता मांजरे, उपसरपंच सुमन मांजरे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मांजरे, सतीश मलघे, मयुरी मांजरे, सुरेखा मलघे, शरद मांजरे, खेड तालुका राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष विलास मांजरे, माजी उपसरपंच दिनकर मांजरे अर्जुन मांजरे, किसन मांजरे, अशोक मांजरे, जयसिंग मांजरे, पोलिस पाटील युवराज मांजरे. सुभाष मांजरे, पिराजी मांजरे, बबन मांजरे. ग्रामसेवक जहांगीर सय्यद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
१७ दावडी
मांजरेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपस्थित ग्रामस्थ.