तसेच सुखसागरनगर भाग क्रमांक १ मध्ये ड्रेनेज लाईन टाकणे व रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचेही भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी एकूण ६० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरानाने संपूर्ण देशात हाहाकार पसरवला होता. त्यामुळे सर्वच नियोजित कार्यक्रम रद्द झाले होते. तसेच, अनेक विकासकामांना खीळ बसली होती. परंतु, आता कोरानाचा प्रभाव कमी झाला आहे. त्यामुळे विकासकामांना पुन्हा गती मिळणार असल्याचा विश्वास कदम यांनी व्यक्त केला.
यावेळी राजा कदम, माजी सरपंच दीपक गुजर, प्रकाश गुजर, शिवाजी पवार, किसन निंबाळकर, सागर बालवडकर, संतोष माने, प्रकाश सासवडे, भानुदास मराठे, सौदाने, दीपक मोहिते, जितेंद्र ओसवाल, डॉ. मनोहर जाधव, डॉ. रूपाली जाधव, धनेश चौधरी आदींसह प्रभाग क्र. ३८ मधील सर्व पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.