या वेळी जुन्नरचे आमदार अतुल बेनके म्हणाले की, उदापूर दिंगोरे जि. प. गटाने निवडणुकांमध्ये विशेष प्रेम दर्शवले आता आघाडी सरकार असल्याने विधानसभेत आपले सर्व प्रश्न मार्गी लावता येत आहेत. उदापूर गाव आणि वाकोबा रस्त्यावरील साकव पुलाची ग्रामस्थांकडून मागणी केली. या पुलासाठी लवकरात लवकर मंजुरी घेऊन निधी उपलब्ध करून पूर्ण करू.
यावेळी जुन्नर पंचायत समिती सभापती विशाल तांबे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जि.प.स दस्य पांडुरंग पवार, जि. प. सदस्य अंकुश आमले, मोहित ढमाले, माजी जि. प. सदस्य बबन तांबे, प. स. सदस्य मंगल उंडे, गणपत मांडे, शरद बँकेचे संचालक विनायक तांबे, बाजार समिती संचालक तुळशीराम शिंदे, उद्योजक जालिंदर पानसरे, संचित फापाळे, जनार्दन खामकर, माजी सरपंच बबनराव कुलवडे, सरपंच सचिन आंबडेकर, उपसरपंच पुष्पलता शिंदे, प्रभाकर शिंदे, नीलेश नारुडकर, दत्ता शिंदे, प्रदीप अमुप, बबलू अमूप, विनोद भोर उपस्थित होते
--
फोटो क्रमांक : १४ ओतूर विकासकामे
उदापूरात विकासकामांचे भूमिपूजन करताना डॉ. अमोल कोल्हे.