वरवंड - कडेठाण रस्ताप्रश्न अनेक दिवसांपासून
प्रलंबित होता, हा रस्ता खराब झाल्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. या रस्त्यासाठी २ कोटी ४० लाख त्रेचाळीस हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
हा रस्ता मंजूर झाल्यामुळे रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे व ग्रामस्थांचा प्रवास सुखकर होणार आहे. या वेळी संजय दिवेकर, नामदेव बारवकर, एम. डी. फरगडे, तानाजी दिवेकर, शिवाजी दिवेकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक फरगडे, ग्रामपंचायत सदस्या मंदाकिनी खोमने, गोरख दिवेकर, राजेंद्र देशमुख, पोलीस पाटील किशोर दिवेकर, संजय जाधव, विजय जाधव, दादा काळे ग्रामस्थ उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : २४वरवंड भूमिपूजन रस्त्याचे काम.
फोटो ओळ- रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करताना.