या वेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष अमित सागळे, गटनेते सचिन हर्णसकर, मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, नगरसेवक चंद्रकांत मळेकर, गणेश पवार, विश्वनाथ रोमन, गणेश मोहिते, प्रशांत बहिरट, तानाजी तारू, मंगेश शिंदे, अभियंता सोनवले आदी उपस्थित होते. भोर नगरपालिकेच्या माध्यमातून शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत शंकरहील येथे २० लक्ष लिटर पाण्याची टाकी बांधणेसाठी ७२ लाख ७० हजार २५८ मंजूर झाले आहे. या कामाचे भूमिपूजन करत राज्यस्तर नागरोत्थान योजनेअंतर्गत बांधलेल्या तीन एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणीही आमदार थोपटे यांनी केली.
आमदार थोपटे म्हणाले, शहराला नियमित आणि उच्च दाबाने पाणीपुरवठा व्हावा यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प व पाण्याची टाकीचे काम होणे महत्त्वाचे होते. यातील जलशुध्दीकरण प्रकल्प झाला असून टाकीचे कामही लवकरच होईल. यामुळे शहराला नियमित शुद्ध पाणीपुरवठा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
१९ भोर
पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन करताना आमदार संग्राम थोपटे. या वेळी उपस्थित निर्मला आवारे व इतर.