पुणे : लॉकडाऊन असताना देखील विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहनचालकांवर पुणे वाहतूक पोलिसांनी बुधवारी कारवाई केली. त्यात 1279 जणांना नोटिसा पाठवण्यात आल्या. तसेच 956 वाहने जप्त करण्यात आली. अशी माहिती पुणे शहराचे वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ संजय शिंदे यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. या संचारबंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे. तसेच विनाकारण फिरताना दिसल्यास अशा व्यक्तींना पोलीस समज देऊन पुन्हा घरी पाठवत आहेत. मात्र अनेकदा समज देऊनही वाहनचालक ऐकत नसल्याची तक्रार वाहतूक पोलिसांनी केली. यावर त्यांनी बेशिस्तपणे व अत्यावश्यक कारणाशिवाय शहरात फिरणा?्या वाहनचालकावर कारवाई करण्यास सुरुवात केली. बुधवारी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण 206 जणांवर कारवाई करून 1279 वाहनचालकांना नोटिसा देण्यात आल्या. तर 956 वाहने जप्त करण्यात आली. शहरात लॉकडाऊनचे आदेश दिल्यानंतर या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहने, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, तसेच वैद्यकीय सेवेसाठी पोलिसांकडून देण्यात आलेली पासधारक वाहने यांना ये जा करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. परंतु या व्यतिरिक्त अनेक वाहनचालक विनाकारण फिरताना दिसून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शहरात 13 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे.त्या चेक पॉईंटवर वाहनांची तपासणी केली जात आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत गरज नसताना रस्त्यावर फिरणा?्या वाहनचालकांवर वाहतूक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबावे. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. असे आवाहन डॉ शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.ऱ्या
लॉकडाऊनमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर पुणे वाहतूक पोलिसांची 'मोठी' कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2020 9:09 PM
संचारबंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई ..
ठळक मुद्दे1279 जणांना दिल्या नोटिसा ; 956 वाहने केली जप्त