PDCC Election: अजित पवारांना मोठा धक्का; भाजपचे 'प्रदीप कंद' विजयी, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात सणसणाटी विजयाची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 11:44 AM2022-01-04T11:44:25+5:302022-01-04T11:45:15+5:30
पुणे जिल्हात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे जिल्हा बँकेच्या ' क ' वर्ग सहकारी बॅका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव करीत राष्ट्रवादी च्या बाल्लेकिल्यात सणसणाटी विजयाची नोंद केली
पुणे : पुणे जिल्हात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या पुणे जिल्हा बँकेच्या ' क ' वर्ग सहकारी बॅका व पतसंस्था गटात भाजपचे उमेदवार प्रदिप कंद यांनी राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांचा १४ मतांनी पराभव करीत राष्ट्रवादी च्या बाल्लेकिल्यात सणसणाटी विजयाची नोंद केली आहे. जिल्हा बँकेच्या कार्यकिर्दीत प्रथमच विरोधी उमेदवाराने राष्ट्रवादी च्या अधिकृत उमेदवाराचा पाडाव करीत पुणे जिल्हा बँकेत प्रवेश केल्याचा इतिहास घडला आहे.
पुणे जिल्हा बँकेच्या १४ जागा बिनविरोध होऊन उर्वरीत ७ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत सर्वाधिक लक्ष्य लागून राहिलेल्या 'क' सहकारी बँका व पतसंस्था गटाकडे अवघ्या जिल्हाचे लक्ष्य लागून राहिले होते. या गटात ८३९ मतदारांपैकी ८०६ मतदारांनी हक्क बजावला होता. मंगळवारी (दि.४ ) रोजी अल्पबचत भवानात पार पडलेल्या मतमोजणीत भाजपचे उमेदवार प्रदिप कंद ४०५ तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली आहे.प्रदिप कंद यांनी घुलेंचा मतांनी पराभव करीत विजयश्री खेचून आणली आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला जिंकला
जिल्हा बँकेच्या 'क' वर्गातून पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते प्रदिप कंद यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिल्हात या जागेसाठी चर्चेचा विषय ठरला होता. राष्ट्रवादीने कंद यांचे आव्हान मोडीत काढण्यासाठी हवेली तालुक्यातूनच सहकारात दिग्गज नेते सुरेश घुलेंना मैदानात उतरवून त्यांचे आव्हान मोडीत काढण्याचा प्रयत्न केला होता. या लढतीची दखल राष्ट्रवादी चे जिल्ह्याचे नेते अजित पवार यांनी घेऊन राष्ट्रवादी च्या उमेदवारांच्या प्रचारात प्रदिप कंद यांच्यावर शेलक्या भाषेत टिकास्त्र सोडून प्रदिप कंद यांना त्यांची जागा दाखवा असे कडक शब्दांत सुणावले होते. परंतु मतदारांनी प्रदिप कंद यांच्या पाठिमागे ठामपणे राहत दणदणीत मतांनी विजयी केले आहे. त्यामुळे या निकालाने जिल्हात राष्ट्रवादीच्या सहकारातील वर्चस्वाची पाळेमुळे उघडी पडली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बारामतीत प्रदीप कंद यांना निर्णायक ५२ मते पडली आहेत.