पुणे: देशात पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तर राज्यात लवकरच महापालिकेच्या निवडणुका होतील. राज्यात राजकीय क्षेत्रातून राजीनामा आणि हकालपट्टीचे सुरु झाले आहे. अशातच पुण्यात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले होते. त्यामध्ये बाळासाहेब चांदेरे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ठाकरे गटातून उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाकरे गटातुन हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगितले होते. त्यानंतर लगेचच ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. आज सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चांदेरे यांच्यासह अनेकजण शिंदे गटात करणार प्रवेश आहेत.
भोर वेल्हा मुळशी या भागतील अनेक शिवसैनिक ठाकरेंची साथ सोडणार आहेत. पुणे जिल्ह्यात चांदेरे भोर विधानसभा लढण्यासाठी ईच्छुक आहेत. मात्र महा विकास आघाडीत भोर मतदार संघ काँग्रेसकडे असल्याने चांदेरे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत करणार प्रवेश आहेत. याआधी सुरुवातीला रमेश कोंडे यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात प्रवेश आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून बाळासाहेब चांदेरे यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
तीन तालुक्यात फायदा
चांदेरे यांनी पुरंदर, हवेली आणि भोर या तीन तालुक्यात ठाकरे गटाचं मोठं काम केलं आहे. या तीन तालुक्यात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे शिंदे गटाला या तीन तालुक्यात मताधिक्य वाढवण्यास मदत होणार आहे. चांदेरे यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाला पुणे जिल्ह्यात फायदा होणार असून ठाकरे गटासाठी मात्र हा मोठा धक्का बसला असल्याची चर्चा सुरु आहे.