शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

आर्थिक गणित जुळेना...हॉटेलचे शटर उघडेना; व्यवसायाला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2021 10:37 PM

कारवाईची भीती, कामगारांचा खर्च अशा कात्रीत व्यावसायिक 

पुणे : एकीकडे शासनाने हॉटेल दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्यास तसेच रात्री ११ पर्यन्त पार्सल देण्यास परवानगी दिली आहे. मात्र, हॉटेल सुरू ठेवण्यासाठी जी वेळ दिली आहे त्या वेळेत ग्राहकच येत नसल्याने शहरातील बहुतांश व्यावसायिकांनी हॉटेल बंद ठेवणेच पसंत केले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेल्या व्यावसायिकांना या स्थितीत हॉटेल उघडणे परवडणारे नाही. केवळ पार्सल सुविधेवर कामगारांचा खर्च भागेल एवढेच उत्पन्न सध्या मिळत असल्याचे हॉटेल व्यावसायिकांनी सांगितले. 

शासनाने केलेल्या नियमामधून हॉटेल व्यवसायिकांना सूट द्यावी. अन्य दुकाने चार वाजता बंद करावीत; परंतु, हॉटेल रात्री साडे अकरापर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी असे पत्र शासनाला पाठविण्यात आले आहे. संध्याकाळी पाचनंतर संचारबंदी आणि जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांची दुपारी तीनपासूनच घरी जाण्याची धावपळ सुरू होते. पोलीस आणि पालिकेची यंत्रणा कारवाई करेल अशी भीती त्यांच्या मनात असते. त्यामुळे दुपारी केवळ खाण्यासाठी हॉटेलमध्ये जाण्याचे प्रमाण सध्यातरी खूपच कमी आहे. 

ज्या कमर्शियल कॉम्प्लेक्स उघडल्या आहेत तेथील रेस्टोरांत उघडले आहेत. मात्र तेथेही ५० टक्क्यांची मर्यादा असल्याने व्यवसायावरच मर्यादा आल्या आहेत. हॉटेल उघडणे हे सध्या आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. अर्धा दिवस हॉटेल उघडे ठेवले तरी कामगारांना पूर्ण दिवसाचा पगार द्यावा लागणार आहे. त्यातच ग्राहक नसल्याने तरकारीपासून सर्वच खर्च अंगावर पडत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. त्यामुळे तूर्तास तरी 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत व्यावसायिक आहेत. १ जुलैपासून काही सूट मिळते का याकडे व्यावसायिकांच्या नजरा लागल्या आहेत.-----हॉटेल चालकांनी त्यांच्या कामगारांचे लसीकरण सुरू केले आहे. खासगी रुग्णालयांसोबत करार करून हे लसीकरण केले जात आहे. मात्र, हा खर्चही व्यवसायिकांना परवडणारा नाही. शासनाने मोफत लस द्यायची घोषणा केली असली तरी लसींचा पुरवठा वेळेत होत नाही. -----पालिकेने नियमभंग केलेल्या १८ पेक्षा अधिक हॉटेलला सील ठोकले आहे. हॉटेल उघडे ठेवल्यावर ग्राहक जास्तीचे टेबल लावण्याचा आग्रह धरतात. पालिका मग कारवाई करते. हॉटेल चालकांना ग्राहकांना दुखवटा येत नाही आणि पालिकेला दण्ड भरल्याशिवाय पर्याय नसतो.-----हॉटेल व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याबाबत आम्ही राज्य शासनासोबत पत्रव्यवहार केला आहे. रात्री साडे अकरा वाजेपर्यंत हॉटेल उघडे ठेवण्यास परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे. दुकान दुपारपर्यंत उघडे ठेवणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे तूर्तास हॉटेल बंद ठेवण्याचाच निर्णय घेण्यात आला आहे.- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टोरंट आणि हॉटेलियर्स असोसिएशन-------शासनाने अचानक हॉटेल उघडण्यास परवानगी दिली. हॉटेल चालकांकडे काम करणारे कामगार गावी गेल्याने मनुष्यबळ उपलब्ध नाही. त्यांना कळविणे आणि पुन्हा बोलावणे यात वेळ जाणार आहे. त्यातच व्यवसायासाठी दिलेली वेळ ही निरुपयोगी आहे. ५० टक्के उपस्थित आणि दुपारी चारपर्यंतची वेळ हे गणित आर्थिकदृष्ट्या न परवडणारे आहे. - किशोर सरपोतदार, पुना गेस्ट हाऊस

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhotelहॉटेलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाbusinessव्यवसाय