पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा : पाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 03:56 PM2018-10-16T15:56:14+5:302018-10-16T16:03:18+5:30

शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे-कलशा घेवून महापालिकेत आले.

big issue in the General Meeting of Pune Municipal Corporation on the water issue | पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा : पाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा : पाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात

Next
ठळक मुद्देनगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच मांडला ठाण पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत केले बंद

पुणे : गेल्या आठवड्यापासून अपेक्षेप्रमाणे पुणे शहरात गाजणाऱ्या पाणीप्रश्नावरुन महापालिकेत गदारोळ करण्यात आला आहे. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे-कलशा घेवून महापालिकेत आले.यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कलशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली. 
     याबाबत अधिक माहिती अशी की, कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचे प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसे नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलते.यंदा प्रथमच पाटबंधारे विभागाने या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले. अर्थात महापालिकेला या प्रकारची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने ऐन नवरात्रीत शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.याच विषयावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडला.या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह नगरसेवक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.

Web Title: big issue in the General Meeting of Pune Municipal Corporation on the water issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.