पुणे-मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दिलीप वळसे पाटील घरात पाय घसरुन पडले आहेत.
दिलीप वळसे पाटील यांच्या खुब्याला मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर आज शस्त्रक्रिया होणार आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात वळसे पाटील यांना केले दाखल केले आहे.
बारामती, अमरावती थोपत नाही तोच, बुलढाणा; संजय गायकवाडांची बंडखोरी, दोन अर्ज भरलेरात्री अंधारात लाईट सुरू करायला जात असताना पाय घसरुन वळसे पाटील पडल्याची माहिती मिळत आहे. यात त्यांच्या हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली.त्यांच्यावर पुण्यातील औंध येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. १२ ते १५ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू राहतील असं सांगण्यात येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील दुखापत झाले आहेत. त्यांच्यावर निवडणुकीची मोठी जबाबदारी आहे. शिवाजी आढळराव पाटलांच्या प्रचाराची प्रमुख जबाबदारी दिलीप वळसे पाटलांवर आहे.