शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
4
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
7
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
8
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
9
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
10
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
11
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
12
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
13
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
14
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
15
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
16
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
17
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
18
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
19
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल

मोठी बातमी! आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 9:28 PM

अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र ; हवामान विभागाचा अंदाज

पुणे : मॉन्सूनचे वारे भारतीय उपखंडाच्या दिशेने वेगाने येत असून आगामी २४ तासात मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि त्याच्या लगतच्या दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात दाखल होण्याची शक्यता आहे.याचवेळी उत्तर अंदमान समुद्रा आणि लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राचे २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तविला आहे. 

अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मॉन्सूनच्या प्रगतीच्या दृष्टीने अनुकुल वातावरण निर्माण झाले आहे.उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या पूर्वमध्ये बंगालच्या उपसागरात येत्या २२ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याचे संकेत असून या कमी दाबाच्या क्षेत्राचे २४ मे रोजी चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर ते २६ मे रोजी सकाळी ओडिशा व पश्चिम बंगाल दरम्यान किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. 

नैऋत्य उत्तर प्रदेश ते मध्य पूर्व अरबी समुद्रापर्यंत पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण मार्गे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

गेल्या २४ तासात गुरुवारी सकाळपर्यंत मुंबई २८.२, नागपूर ३.२, पुणे ७.८, नाशिक १, कोल्हापूर ०.७, रत्नागिरी ९.६, सातारा १.६, पणजी ५५.९ मिमी पावसाची नोंद झाली होती.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २१ मे तसेच २३ व २४ मे रोजी वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात २३ व २४ मे रोजी मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी २४ मे रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

टॅग्स :PuneपुणेMonsoon Specialमानसून स्पेशलweatherहवामानRainपाऊस