शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

मोठी बातमी : पुणे महापालिकेच्या शाळा ३ जानेवारीपर्यंत राहणार बंद : महापौरांनी दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 2:33 PM

यापूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ठळक मुद्देरुग्णवाढीचा अंदाज घेऊन पुढील निर्णय घेणार

पुणे : राज्य शासनाने २३ नोव्हेंबरनंतर शाळा सुरू करण्याचे आदेश काढल्यानंतर शाळा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. परंतु, दिवळीपश्चात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता, पुन्हा ३ जानेवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या आदेशांनातर पुणे पालिकेने शिक्षकांना कोविड चाचणी करून घेण्याचा सूचना केल्या होत्या. दरम्यान, मुंबई पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळांचा निर्णय स्थानिक संस्थांवर सोडला होता. 

शासनाच्या आदेशानंतर पालिकेने २३ नोव्हेंबरनंतर नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. शाळा सुरू करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांच्या तपासणीसाठी रांगा लागल्या होत्या. यासोबतच पालकांकडून मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र घेण्यास सुरुवातही करण्यात आली होती. परंतु, पालकांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. तसेच, मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचे सांगितले.  त्यामुळे मुंबई पाठोपाठ पुण्यातही शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता, पुन्हा कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन ही मुदत ३ जानेवारीपर्यंत लांबविण्यात आली आहे. -------पुणे पालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याच्या निर्णय घेतला होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या त्यापार्श्वभूमीवर रुग्णवाढीचा अंदाज घेऊन शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सद्यःस्थितीमध्ये कोरोना आवाक्यात असला तरी पूर्णपणे धोका टाळलेला नाही. मुलांना शाळेत पाठविण्याची पालकांची मनस्थिती नाही. त्यामुळे येत्या ३ जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. 

- मुरलीधर मोहोळ, महापौर

टॅग्स :PuneपुणेEducationशिक्षणcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाStudentविद्यार्थी